‘शाळेतला बेस्ट ऑफ फाईवला सुटलेला विषय कोणता?’ आमच्या मित्रांमध्ये चर्चा सुरू होती. पण, डोक्याला ताण देऊनही काही आठवेना. घरी जाऊन पुन्हा एकदा मार्कलिस्ट पाहीली. तेव्हा कळलं की शाळेत ‘इतिहास’ थोडा कच्चाच होता. शाळेत असतानाचा सगळ्यात कंटाळवाणा विषय कोणता तर ‘इतिहास’च. कोणी तरी, कोणाशी तरी युद्ध केलं, ते आम्ही का लक्षात ठेवायचं. त्यात काही केल्या कोणत्या तारखेला काय झालं हे कधीच पाठ झालं नाही. घोकंपट्टी करून पास झालो. त्यामुळे ‘बेस्ट ऑफ फाईव’ मध्ये इतिहास सुटला.

पण, इतिहासाची खरी गोडी लागली ती भटकंती करताना. एखाद्या ठिकाणी जाताना तिथे काय झालं होतं, हे आपसूकच वाचलं जातं. तिथे बघण्यासारखं काय आहे? त्याचं महत्त्व काय? ते का बघावं? तिथे काय चाखावं? तिथली कोणती गोष्ट काय सांगते? असे एक ना अनेक प्रश्न पडत जातात. प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यावर तर हळूहळू इतिहास उलगडत जातो. अशा वेळी ती केवळ एक सहल किंवा ट्रेक राहत नाही, तो एक इतिहासाचा तासच असतो. इथे रात्री कोणाच्या तरी घरी वस्तीला राहिल्यावर चुलीवरची झुणका भाकर तर खायला मिळतेच, पण आजोबा किल्ल्याच्या गोष्टी सांगतात, कविता ऐकवतात, ती सुद्धा माच्यासाठी मेजवानीच असते.

मला फार काही इतिहास माहीत नाही. पण, जितका माहीत आहे, लक्षात राहिला आहे, तो इथेच ऐकलेला, वाचलेला, पाहीलेला, समजून घेतलेला. शाळेत वाटलेला तितका तो आता कंटाळवाणा राहिलेला नाही. पण, हे सारं जुळून आलं ते या भटकंतीमुळे. वर्गाबाहेर घेतलेल्या या शिक्षणाचं कुठे सर्टीफिकेट मिळत नसलं, तरी आयुष्यात खूप उपयोग झाला.

पण, माझ्यासारखे अजून कित्येक विद्यार्थी शाळेत आहेत, ज्यांच्यासाठी इतिहास हा कंटाळवाणा विषय आहे. त्यांना सुद्धा आपण ही संधी दिली तर. पुस्तकात पाहीलेलं एखादं ठिकाण प्रत्यक्ष पाहण्याची, तिथला इतिहास जवळून समजून घेण्याची, पडलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधण्याची.

देऊ या?

म्हणूनच मी माझ्या या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोचण्याचं आणि या विद्यार्थ्यांना ही संधी मिळवून द्यायचं ठरवलं आहे. ‘ट्रेक ब्रेक’ नावाचा नवा उपक्रम हाती घेत मी ४० शालेय विद्यार्थ्यांना थेट एका किल्ल्यावर घेऊन चाललो आहे, तेही विनामुल्य. या विद्यार्थ्यांना किल्ला म्हणजे काय? किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार कोणते? त्याच्या कोणत्या भागाला काय म्हणतात आणि का? भेट देणार असलेल्या किल्ल्याचा इतिहास, तिथल्या वेगवेगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगण्यात येतील. त्यांना इतिहास हा विषय शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी कसा सोप्पा जाईल, हे पाहीलं जाईल. शिवाय त्यांना किल्ल्यांबाबत आपुलकी निर्माण होणं गरजेचं आहे. ती केवळ सहलीची जागा नाही, हे त्यांना पटवून दिलं जाईल. गडकिल्ल्यांचा इतिहास समजून घेण्याची त्यांना गोडी लागावी यासाठी पुरेपूर मेहनत घेण्यात येईल. अर्थात या सगळ्यासाठी खर्च मोठा असला, तरी तुम्ही सगळेच माझ्या मदतीला असाल, याची मला खात्री आहे.

या उपक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. त्यामुळे हे आर्टिकल तुमच्या ओळखीतल्या सर्वांना पाठवून एक प्रकारे आम्हाला मदतच करत आहात. साधारणपणे एका विद्यार्थ्यामागे कमीत कमी रुपये तीनशे मात्र इतका खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तितकी तुम्ही आर्थिक मदतही करू शकतात. या चाळीस विद्यार्थ्यांसोबत त्यांचे काही शिक्षकही असतील, मात्र ट्रेकच्या वेळी काही स्वयंसेवकही आपल्याला लागतील. त्यामुळे ट्रेकिंगची आवड आहे, अशा तरुणांनी या उपक्रमात सहभागी व्हायला हरकत नाही. मात्र या वेळी स्वतःच्या ट्रेकचा खर्च करतानाच किमान एका विद्यार्थ्यांचा खर्च उचलणं अपेक्षित असेल.

उपक्रमाच्या संदर्भात सर्व माहिती CityNextDoor.com वर वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही ९००४०३५५१५ या क्रमांकावर मला संपर्क साधू शकतात.

आर्थिक मदतीसाठी खालील बटनावर क्लिक करा किंवा ९००४०३५५१५ या क्रमांकावर पेटीएम करा.

शिवाय एनईएफटीचा पर्याय वापरून तुम्ही थेट आपल्या अकाऊंटमधून पैसे पाठवू शकतात.
Acc: 919004035515
IFSC: PYTM0123456
Name: Dipesh Vedak