• facebook
 • twitter
 • instagram

BUCKET LIST

मी पाहिलेली लहान मोठी स्वप्नं मी या यादीतून तुमच्यासमोर ठेवत आहे. या भल्या मोठ्या यादीमध्ये तुमचं स्वागत आहे.

स्वप्नं बघणं हा मानवी स्वभाव आहे. स्वप्नं बघण्याला काही बंधन नसतं. त्यामुळे ही यादी दररोज बदलत राहील. पण, यादीतलं सर्वात मोठं स्वप्न ते म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत हे जगभर फिरत राहायचं आणि हा सारा प्रवास तुमच्यासमोर शब्द रुपात मांडायचा. जमेल तेव्हा तो रेकॉर्ड करून दाखवायचा.

पण, हा प्रवास करतानाच मी पाहिलेली माझी काही स्वप्नं सुद्धा मला पूर्ण करायची आहेत, ती ही.

 • सह्याद्रीतले शक्य तितके किल्ले चढायचे आहेत.
 • महाराष्ट्रातले सगळे जिल्हे फिरायचे आहेत.
 • शाळेतल्या मुलांना घेऊन एक ट्रेक करायचा आहे. (२ ट्रेक केले.)
 • वाराणसीला जाऊन होळी साजरी करायची आहे.
 • २१ किमी मॅरेथॉन पूर्ण करायची आहे.
 • बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स पूर्ण करायचा आहे. 
 • विमान प्रवास करायचा आहे.
 • एक पुस्तक लिहायचं आहे.
 • हेलिकॉप्टरने प्रवास करायचा आहे.
 • एखादी परदेशी भाषा शिकायची आहे.
 • जायंट स्विंग करायचं आहे.
 • बुलेट वरून लेह-लदाख फिरायचं आहे.
 • एव्हरेस्ट बेस कँप गाठायचा आहे.
 • सीआचेन सिव्हिलिअन ट्रेक करायचा आहे.
 • नैसर्गिक गरम पाण्याच्या स्त्रोतात बसून रीलॅक्स व्हायचं आहे.
 • देशाच्या वेगवेगळ्या भागातील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यायचा आहे.
 • हॉट एअर बलूनमध्ये बसायचं आहे.
 • स्काय डाइव्ह करायचं आहे.
 • बंजी जंपिंग करायचं आहे.
 • स्वत:ची कँपर व्हॅन तयार करायची आहे.
 • नवीन वर्षाचं स्वागत न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये उभं राहून करायचं आहे.
 • जगातली नवी सात आश्चर्य पहायची आहेत.
 • ग्रेट पिरॅमिड ऑफ गीझा बघायचा आहे.
 • शहामृगावर बसून राईड घ्यायची आहे.
 • नॉर्दन लाईट्स पहायच्या आहेत.
 • डेव्हिल्स पूलमध्ये पोहायचं आहे.
 • ग्रेट वॉल ऑफ चायना बघायचं आहे.
 • डेड सीमध्ये तरंगायचं आहे.
 • टूमॉरोलँड म्युझिक फेस्टिव्हलमध्ये नाचायचं आहे.
 • आयफेल टॉवर बघायचा आहे.
 • ग्रेट बॅरीअर रीफ मध्ये स्कुबा डायव्हिंग करायचं आहे.
 • ज्वालामुखीवर शिजवलेली कोंबडी खाण्यासाठी एल दीआब्लो या रेस्टॉरंटला जायचं आहे.
 • मरीना बे सँडसच्या इंफिनिटी पूलमध्ये पोहायचं आहे.

यातली एखादी गोष्ट तुम्ही केलीत, तर तुमचा अनुभव आमच्यापर्यंत पोचवा. आम्हाला तो ऐकायला आवडेल. शिवाय तुमच्या बकेट लिस्टमध्ये काय काय आहे, हे सुद्धा नक्की कळवा. कदाचित एखादं स्वप्न आपण एकत्रच पूर्ण करू.

Skip to toolbar