कसं काय मंडळी सगळं ठीक ना? महत्त्वाचं म्हणजे तुमची भटकंती सुरू आहे ना?

रोजच्या कामातून वेळ काढत तुम्ही माझी वेबसाईट बघत आहात त्यासाठी धन्यवाद.

मी, दीपेश मोहन वेदक भटकंतीची आवड असलेला एक प्रवासी.

ही वेबसाईट म्हणजे अशी जागा आहे, जिथे मी माझी भटकंती तुमच्यासाठी खुली करत आहे आणि तुम्हालाही या प्रवासाला घेऊन जाणार आहे. तेव्हा तुम्ही या भटकंतीमध्ये नवीन असाल, तर तुमचे या वेबसाईटवर स्वागत.

कॉलेज-ऑफिस ते घर इतकाच काय तो आपल्यापैकी अनेकांचा प्रवास. काही दिवसांपूर्वी माझंही असंच होतं. पण, आपला जन्म केवळ या प्रवासासाठी नाही झाला, याचा जणू साक्षात्कारच झाला. आणि मी निघालो एका नव्या प्रवासाला. आता हा प्रवास शब्द रुपात मांडायचा आहे, तो रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवायचा आहे, म्हणून हा सगळा खटाटोप.

अर्थात हे फोटो आणि व्हिडियो काढताना, या प्रवासात भेटलेली त्या ठिकाणची माणसं, तिथली संस्कृती आणि बरंच काही समजून घेण्याचा माझा प्रयत्न असेल, त्यामुळे हा नेहमीचा टिपिकल ब्लॉग नसेल, हे मात्र नक्की.

इतिहासाचा मागोवा घेत, लिखाणाची आवड जपत, जिभेचे चोचले पुरवत सुरू झालेला हा प्रवास मला कुठे कुठे नेईल, माहीत नाही. पण, तुम्ही कुठेही जाऊ नका, माझे ब्लॉग, व्हिडियो बघत राहा. कुणास ठाऊक, कदाचित आपण एकाच प्रवासाला निघालेलो असू.

खूप सारं प्रेम आणि पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा,

तुमचा दीपेश